DEPARTMENT OF LIFELONG LEARNING & EXTENSION
About Department
      आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार मंडळाची तरतूद करण्यात आली आहे. या मंडळाअंतर्गत कार्यरत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग मागील काही वर्षापासून समाजातील मागास घटक विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. पदवी वपदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराभिमुख तसेच कौशल्यपूर्ण बनवण्याचे कार्य विविध व नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करीत आहे.
      1994 च्या विद्यापीठ कायद्यातील कलम 45 नुसार प्रौढ शिक्षण व निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा मंडळाच्या उद्दिष्टानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी आजीवन अध्ययन, जीवन कौशल्य, विविध संशोधन संस्था आणि शासकीय अधिकारी ईत्यादी मध्ये धोरणात्मक व कार्यात्मक स्तरावर साहचर्य निर्माण करण्याची जबाबदारी विद्यापीठावर सोपवली आहे. त्यामुळे बदलता जीवनप्रवाहयातील नवनवीन आव्हानेआणि तंत्रज्ञानयुक्त जीवनात औपचारिक शिक्षण प्रक्रियेला एक पर्याय म्हणून विभागाने विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने सुरू झालेल्या उद्योग-व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य अभ्यासक्रमाची निर्मिती करून त्याची कार्यवाही करण्यासाठी अग्रेसर धोरण स्वीकारले आहे. एम ए समुपदेशन व मानसोपचार,एमए. आजीवन अध्ययन व विस्तार, पीजी डिप्लोमा इन इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, पीजी डिप्लोमा इन योगथेरपीया समाज उपयोगी व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातून समाजातील विविध समूह विकासाकरीता योगदान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका आजीवन अध्ययन व विस्तार विभाग पार पाडीत आहे.
      कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या अंगांच्या कलाकौशल्याच्या आधारे आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टीने आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अनेक महाविद्यालय तसेच समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने महाविद्यालयातील हजारो तरुण-तरुणींना विविध 33 प्रकारच्या कौशल्यपूर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची निर्मिती करून अभ्यासक्रमाचे यशस्वी संचालन करीत आहे.
      आधुनिक शिक्षण प्रणालीच्या प्रवाहात समाजातील युवकांसोबतच प्रौढ व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा, त्यांच्यासमस्या लक्षात घेत त्यांच्यातील कौशल्य विकासाला चालना देण्याचे कामआणि रोजगारभिमुख सक्षम समाजाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट पूर्तीसाठी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इतर प्राधिकरणाच्या मार्गदर्शनात व सहकार्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
Vision
Mission